Father’s Day 2024 । यंदा ‘फादर्स डे’ कधी आहे? कसा आणि का सुरू झाला फादर्स डे? वाचा रंजक इतिहास….

Father’s Day 2024 । Father’s Day Celebrated : जगात दरवर्षी ‘मदर्स डे’सोबतच ‘फादर्स डे’ही साजरा केला जातो. या दिवशी मुले त्यांच्या वडिलांचे आभार मानतात आणि केक कापून किंवा भेटवस्तू देऊन वडिलांसोबत आनंद साजरा करतात. पण हा दिवस कधी, कुठे आणि कसा सुरू झाला हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ‘फादर्स डे’ पहिल्यांदा कुठे साजरा करण्यात आला आणि जगभरात तो अधिकृतपणे कधी सुरू झाला.
फादर्स डे (पितृदिन) –
फादर्स डे दरवर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो. यावेळी 16 जून (रविवार) रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘फादर्स डे’ पहिल्यांदा अमेरिकेत 1907 मध्ये अनधिकृतपणे साजरा करण्यात आला. तर त्याची अधिकृतरीत्या सुरुवात 1910 मध्ये झाली. मात्र, ‘फादर्स डे’ साजरा करण्याच्या तारखेबाबत तज्ज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत.
इतिहासकारांच्या मते, या दिवसाची सुरुवात सोनोरा स्मार्ट दोडने यांनी केली होती. खरं तर, सोनेरा लहान असताना तिची आई वारली आणि तिचे वडील विल्यम स्मार्ट यांनी तिला आई आणि वडील दोघांचे प्रेम दिले. वडिलांचे प्रेम, त्याग आणि समर्पण पाहून मदर्स डेच्या धर्तीवर ‘फादर्स डे’ साजरा करण्याचा विचार केला.
पहिल्यांदा ‘फादर्स डे’ साजरा केला –
त्यानंतर 19 जून 1909 रोजी डॉडने पहिल्यांदा फादर्स डे साजरा केला. 1924 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष केल्विन कुली यांनी फादर्स डेला मान्यता दिली होती. चार दशकांनंतर, राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी 1966 मध्ये घोषणा केली की दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी ‘फादर्स डे’ साजरा केला जाईल. या दिवसाला अमेरिकेत अधिकृत सुट्टी असते.
‘फादर्स डे’ चे महत्व –
‘फादर्स डे’ निमित्त वडिलांचे योगदान, त्यांचे कष्ट, त्याग आणि मुलांसाठी त्यांनी केलेले समर्पण, प्रेम यांचे स्मरण केले जाते. इतकेच नाही तर हा दिवस आपल्याला वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांनी त्यांच्या जीवनात केलेले त्याग आणि समर्पण समजून घेण्याची संधी देतो. फादर्स डे साजरा करण्याचा मुख्य उद्देश वडिलांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करणे हा आहे.
हा दिवस विशेषतः त्यांच्या वडिलांच्या त्याग, कठोर परिश्रम आणि निःस्वार्थ सेवेची प्रशंसा करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस वडिलांसह संपूर्ण कुटुंबाने एकत्र साजरा केला पाहिजे आणि वडिलांच्या समर्पणाचे स्मरण करून त्यांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. यंदा ‘फादर्स डे’ 16 जून (रविवार) रोजी साजरा केला जाणार आहे.





