विलगीकरण कक्षावर वीज पडल्याने वडील-मुलगी जखमी
Updated On:

महासमुंद – छत्तीसगड राज्यातील महासमुंद या जिल्ह्यातील खल्लारी पोलीस ठाण्याअंतर्गत नायक बांधा या विलगीकरण कक्षावर रात्री वीज पडल्यामुळे येथे क्वारंटाइन करण्यात आलेले वडील आणि मुलगी जखमी झाले.
वडील नरेश कुमार निषाद आणि त्यांची मुलगी रीना गंभीर हे दोघे गंभीर जखमी झाले. विलगीकरण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित अपात्कालीन सेवांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती पाहता त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या दोघांना येथे 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, रात्रीच्या वेळी पाऊस पडत होता, त्यातच अकाशात वीज कडाडून या विलगीकरण कक्षावर पडली. बाकीचे क्वारंटाइन केलेले लोक बचावले मात्र, वडील व मुलगी गंभीर जखमी झाले.





