Viral Video : “बाप असावा तर असा”; मुलीच्या घटस्फोटानंतर केलं अनोखं स्वागत, व्हिडिओ व्हायरल
Viral Video : मेरठमध्ये एका वडिलांनी आपल्या मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर तिचे जल्लोषात स्वागत केले.

Viral Video : मेरठ येथे घडलेल्या एका वेगळ्या घटनेने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. मुलीच्या घटस्फोटानंतर वडिलांनी ढोल-ताशांच्या गजरात तिचं स्वागत करत आनंद साजरा केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सामान्यतः घटस्फोटानंतर महिलांवर मानसिक ताण येतो आणि कुटुंबीयही चिंतेत असतात. मात्र, या प्रकरणात वडिलांनी पारंपरिक विचारांना छेद देत मुलीच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीचा उत्सव साजरा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओतील महिलेचं नाव प्रतीक्षा असून ती शास्त्री नगर परिसरातील रहिवासी आहे. 2018 मध्ये तिचा विवाह गौरव अग्निहोत्री यांच्याशी झाला होता. या दांपत्याला एक मुलगाही आहे. मात्र, वैवाहिक आयुष्यातील मतभेद आणि सासरच्या छळामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
शादी के 7 साल बाद प्रणिता शर्मा का मेजर गौरव अग्निहोत्री से तलाक। बेटी के घर लौटने पर ढोल–नगाड़े, नाच और एक जैसी टीशर्ट –
“I Love My Daughter”। पिता रिटायर जज ने भव्य स्वागत किया। यह moving on का जश्न था।#Divorce #Meerut #UP #DaughterLove #CelebratingLife pic.twitter.com/iWg921MhcD— ilyas khan (@ilyasilukhan) April 5, 2026
दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर 4 एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना अधिकृत घटस्फोट मंजूर केला. ही बातमी घेऊन प्रतीक्षा घरी परतताच तिच्या वडिलांनी आणि कुटुंबीयांनी ढोल-ताशांच्या गजरात तिचं स्वागत केलं. यावेळी तिच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच “I Love My Bitiya” असे लिहिलेले टी-शर्ट घालून कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.
या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून नेटकऱ्यांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी वडिलांच्या या सकारात्मक आणि आधार देणाऱ्या भूमिकेचं कौतुक केलं आहे, तर काहींनी या प्रकारावर टीकाही केली आहे.





