Crime News: गणपती सजावटीच्या सामानावरून वडिलांना पाइपने मारहाण
Crime News: फिर्यादीच्या पत्नीनेही दिली धमकी

पिंपरी – घरात गणपती सजावटीचे साहित्य रस्त्यात ठेवल्यावरून जाब विचारल्याच्या रागातून मुलगा आणि पत्नीने मिळून वडिलांना मारहाण केली. ही घटना १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास सुसगाव येथील साईप्रेरणा अपार्टमेंटमध्ये घडली.
प्रथमेश रामनाथ कासार आणि एक महिला (दोघेही रा. साईप्रेरणा अपार्टमेंट, निकाळजे वस्ती, सुसगाव, मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनाथ ज्ञानदेव कासार (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी मुलगा प्रथमेश याला गणपती सजावटीचे साहित्य रस्त्यात का ठेवले, बाजूला ठेव असे सांगितले. याचा राग आल्याने प्रथमेशने फिर्यादींना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी मोबाइलमध्ये या घटनेचा व्हिडिओ काढत असताना मुलाने तो हिसकावून घेतला.
यावेळी फिर्यादीच्या पत्नीनेही “व्हिडिओ का काढतो, तुझे तुकडे करते” अशी धमकी देत मारहाण केली. तर मुलाने पीव्हीसी पाइपने फिर्यादीच्या डोक्यात, पाठीत, मानेवर आणि पायावर जोरदार प्रहार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणाचा पुढील तपास बावधन पोलीस करत आहेत.





