Nagar | खांडगावात तरसचा नागरिकांवर जीवघेणा हल्ला

नगर, (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथील रहिवासी चंपालाल यल्लाप्पा कुऱ्हाडे यांच्या वस्तीवर दोन तरसाने जीवघेणा हल्ला केला असून ते त्यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भर दिवसा नागरी वसाहतीमध्ये हिंसक प्राणी येऊन नागरिकांवर जीवघेणा हल्ला करत आहेत. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चंपालाल कुऱ्हाडे यांचा जीव वाचला आहे. नागरिकांनी देखील तरसावर हल्ला केल्यामुळे चंपालाल कुऱ्हाडे यांना सोडून दिले. वन विभागाने हिंसक प्राण्यांपासून नागरिकांच्या संरक्षणाची काळजी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वन विभागाने नागरिकांच्या संरक्षणाची काळजी घ्यावी : सचिन जगताप.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी तरसाच्या हल्ल्यात जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय येथे आणून त्यांच्यावर उपचार सुरू केले. दरम्य़ान वन विभागाने हिंसक प्राण्यांपासून नागरिकांच्या संरक्षणाची काळजी घ्यावी, अशी मागणी सचिन जगताप यांनी वन विभागाकडे केली





