मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

महाड – भरधाव टेम्पोने रस्त्यावरून जात असलेल्या चार पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अज्ञात वाहनाला टेम्पोची धडक बसली. यात टेम्पोच्या कॅबिनचा चुराडा झाला आहे. कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकदेखील जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती हे महाड एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होते. सोमवारी रात्रपाळीसाठी चौघेही कामावर निघाले होते. रस्त्यावरून पायी जात असताना काळीजकोंड परिसरात एका भरधाव टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली शत दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
फॉर्च्यूनर-ऑटोचा भीषण अपघात; एक ठार
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग सोमवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव फॉर्च्यूनर कारने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की रिक्षाने दोन ते तीन पलट्या मारल्या. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.





