“आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो” म्हणत फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला यांनी केलं मतदान

Farooq Abdullah। लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 96 जागांवर मतदान होणार आहे. यावेळी जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या काही जागांसाठी मतदान पार आहे. त्यासाठीJKNC प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी मतदान केले.
JKNC प्रमुख फारुख अब्दुल्ला श्रीनगरमधील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. त्याच्या सोबत ओमर अब्दुल्ला यांनीदेखील मतदान केलं. यावेळी प्रतिक्रिया डेटन”आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो. लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका देखील पार पडतील अशी आम्हाला आशा होती. नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावं असं आवाहन ओमर अब्दुल्ला यांनी केलं.
#WATCH | JKNC Chief Farooq Abdullah arrives at a polling booth in Srinagar to cast his vote for #LokSabhaElections2024
National Conference (NC) has fielded Aga Syed Ruhullah Mehdi from the Srinagar Lok Sabha seat, PDP fielded Waheed-ur-Rehman Para, and J&K Apni Party’s fielded… pic.twitter.com/y2gJfQ1Jxz
— ANI (@ANI) May 13, 2024
जम्मू काश्मीरमध्ये यावेळी नॅशनल कॉन्फरन्सने (NC) आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांना श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून, पीडीपीने वहीद-उर-रेहमान पारा आणि जम्मू-कश्मीर आपनी पक्षाने मोहम्मद अश्रफ मीर यांना उमेदवारी दिली आहे.

