Heavy Rain: सततच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत
Heavy Rain:

कामशेत – परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. सततच्या पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भात लागवडीची कामे ठप्प झाली असून शेतकरी चिंतेत आहेत.
शेतांमध्ये पाणी ओसरण्याऐवजी वाढत असल्याने लावणी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे रखडली आहेत. आणखी चार ते पाच दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास पिकांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता पावसाने विश्रांती घ्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
इंद्रायणी नदीकाठावरील अनेक शेतजमिनी पुन्हा पाण्याखाली गेल्या आहेत. तसेच वडिवळे धरण ९७ टक्के भरले असून त्यातून सुमारे ३,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणालगतची शेतीही जलमय झाली आहे.
सततच्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. जनजीवन विस्कळीत झाले असून बाजारपेठांवरही त्याचा परिणाम झाला आहे. पावसाच्या भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने बाजारपेठांमध्येही शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
pune: टाळ-मृदंग आणि विठूनामाच्या गजराने सूर्यदत्त स्कूलमध्ये अवतरले पंढरपूर





