पुणे जिल्हा | शेतकऱ्यांनी विक्री कौशल्य आत्मसात करावे

पिरंगुट (वार्ताहर) – मुळशी तालुक्यात भात व फळ झाडांचे उत्पन्न चांगले येते. त्याची विक्री शेतकरींनी स्वत:च केल्यास अधिक फायदा मिळेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करून विक्री कौशल्य शिकावे, असे मत रॅन्डॅक कंपनीचे कार्यकारी संचालक सतीश भिडे व्यक्त केले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथे मुळशी तालुका शेतकरी संघाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन एक लाख झाडे लावली. त्यामध्ये केसर, हापूस, नारळ, जांभूळ, चिकू, आवळा, फणस झाडांचा समावेश आहे.
एक लाखावे झाड लावण्याचा कार्यक्रम पिरंगुट येथे घेण्यात आला. रॅन्डॅक कंपनीचे कार्यकारी संचालक सतीश भिडे, उद्योगपती डॉ. सुभाष पल्लोड व माजी आमदार शरद ढमाले यांच्या हस्ते लक्ष्मण निकटे यांच्या शेतात घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, कृषी आधिकारी हनुमंत खाडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे,
शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन खैरे, बाजार समितीचे उपसभापती दगडूकाका करंजावणे, माजी उपसरपंच वैभव पवळे, सुनील वाडकर, संघाचे राजेंद्र मारणे, भाऊ केदारी, राम गायकवाड व भाऊ आखाडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुभाष पल्लोड म्हणाले की, शेतकरी संघाने फळ प्रक्रिया उद्योग सुरू करावा. स्वताचा एक ब्रॅण्ड तयार करून विविध उत्पादने विक्री करावी. तसेच वेगवेगळी फळझाडे लावून उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा.





