Farmers Protest : आंदोलक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे पुन्हा चर्चेचे निमंत्रण

Farmers Protest: कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी बुधवारी आंदोलक शेतकऱ्यांना एमएसपीच्या मुख्य मागणीसह सर्व मुद्द्यांवर चर्चेच्या पाचव्या फेरीसाठी पुन्हा आमंत्रित केले आहे. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आणि तोडगा काढण्यासाठी संवाद साधण्याचे आवाहन केले.
दरम्यान शेतकरी आंदोलकांनी दिल्लीकडे कुच करण्याचा आपला निर्धार कायम ठेवला असून सरकारने आम्हाला दिल्लीकडे येण्यासाठी अनुमती द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कृषीमंत्री मुंडा म्हणाले की, आम्ही सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहोत, मग तो एमएसपी असो किंवा पीक वैविध्यता. आम्ही केवळ संवादातूनच तोडगा काढू शकतो. मी त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे आणि त्यांना शांतता राखण्याचे आणि सर्वांच्या हिताचा तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
दिल्ली चलो आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या शेतकरी नेत्यांनी चर्चेची चौथी फेरी अयशस्वी झाल्यानंतर बुधवारी पंजाब आणि हरियाणा सीमेवरून पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे
प्रमुख पिकांसाठी एमएसपी आणि पेन्शनची कायदेशीर हमी या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत.





