शेतकरी आंदोलन: अरविंद केजरीवालही करणार उपोषण
Updated On:

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात उद्या शेतकऱ्यांनी देशभर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आयोजित केले आहे, त्या उपोषणात सहभागी होण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे.
आज या संबंधात पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली असून एमएसपीसाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
उद्या शेतकरी आंदोलकांच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे त्यात आपणही सहभागी होणार असून आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही त्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. कृषी कायद्यांमुळे देशात आता नफेखोरी आणि काळाबाजार, साठेबाजी कायदेशीर ठरवली गेली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.




