Monsoon Delayed: दुहेरी संकट! पाटबंधारे विभागाकडून पाणीबंदी; शेतकरी संतप्त
Monsoon Delayed: मान्सून यंदा जून महिना संपत आला तरी रुसलेलाच

Chakan News : जून महिना संपत आला तरी अद्याप मान्सूनचा दमदार पाऊस न झाल्याने राज्यातील बळीराजा चिंतेत सापडला आहे. पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या असून, आधीच लावलेली पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.
अशा अत्यंत कठीण परिस्थितीत पाटबंधारे विभागाने शेतीसाठी पाणी उचलण्यास अचानक बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
पावसाची ओढ आणि पिकांचे नुकसान (Monsoon Delayed)
दरवर्षी जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावणारा मान्सून यंदा महिना संपत आला तरी रुसलेलाच आहे. कडक ऊन आणि पाऊसच नसल्याने शेतातील उभी पिके कोमेजू लागली आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला विहिरी किंवा बोअरवेलच्या जोरावर कशाबशा पेरण्या केल्या होत्या, त्यांचेही पाण्याचे स्रोत आता आटले आहेत. त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकरी आता पूर्णपणे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
यातच आता एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे प्रशासनाची ही पाणीबंदी यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
हेही वाचा:





