गव्हास पोषक वातावरण असल्याने शेतकरी समाधानी

गव्हाच्या क्षेत्रापैकी 93 टक्के क्षेत्रावर पेरणी, अजूनही पेरणी प्रगतीपथावर
नगर – जिल्ह्यात सद्या विविध पिकांची पेरणी प्रगतीपथावर असून यंदा गव्हाचीपेरणी सर्वात जास्त झाली असून एकुण सरासरीच्या 93 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, अजूनही पेरणी प्रगतीपथावर आहे. त्या खालोखाल ज्वारीच्या पिकाला शेतकऱ्यांची पसंती असून सरासरी 54 टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी करण्यात आली असून उर्वरीत क्षेत्रातही पेरणी प्रगती पथावर आहे. त्याखालोखाल मका आणि इतर तृण धान्याची पेरणी 55 टक्के क्षेत्रावर झाली आहे.
यंदा अकाली पाऊस झाल्याने खरीपाची बरीच पिकं शेवटच्या टप्प्यात हातातून गेली. मात्र रब्बी हंगामाला त्याचा फायदा होतांना दिसत आहे. जमीनीत ओल कायम असल्याने ते गहू आणि ज्वारीच्या पिकाला पोषक ठरले आहे त्यातच आता थंडी वाढू लागल्याने हे वातावरण गव्हाला पोषक ठरत आहे.
गव्हाला जिल्ह्यात पोषक असे वातावरण असल्याने 49 हजार 785 हेक़्टर जमिनी पैकी 46 हजार 60 हेक्टर जमीनीवर गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. तर ज्वारीचे क्षेत्र 4लाख 69 हजार 785 इतके असून त्यापैकी 2लाख 53 हजार 462 हेक्टर जमिनीवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण क्षेत्र 6 लाख 67 हजार 261 क्षेत्रापैकी आतापर्यंत 3 लाख 69 हजार 675 म्हणजेच एकुण जागेच्या 55 टक्के पेरणी पूर्ण झाली असून त्याची सरासरी 55 टक्क्यां एव्हढी आहे.
सध्या जिल्ह्यात ढगाळ हवामान असून सद्या तूरीचे पिकाने 32 हजार 985 इतकेक्षेत्र व्यापले असून पिक शेंगा व दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. अल्प प्रमाणात पाने खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसून आला असून उपाय योजना सुरू आहे. तर कापसाची पेरणी 1 लाख 30 हजार 432 हेक्टरवर झाली असून पिकपक्वतेच्या अवस्थेत असून कापूस वेचणी चालू आहे.
उशिरा लागवड झालेल्या पिकावर अल्प प्रमाणात शेंद्रीय बोंड आळीचा प्रादुर्भाव दिसत असून त्यावर इमेमॅक्टीन बेन्झॉइड ची फवारणी करण्याची शिफारस केलेली आहे. ज्वारी पिकाची 2 लाख53 हजार 462 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून पिक पोटरी अवस्थेत आहे.
अल्प प्रमाणात अमेरीकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसत असून शेती शाळेचे आयोजन करून शेतकऱ्यांना किड नियंत्रणाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. गहू आणि मक्याच्या पेअरण्या प्रगती पथावर असून गव्हाला पोषक असे वातावरण तयार होत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.





