Farmer Suicide : धक्कादायक ! कर्ज वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
नांदेड जिल्ह्यात ५३ वर्षीय शेतकऱ्याने रेल्वे रुळावर आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. एका खासगी वित्त कंपनीच्या कर्ज वसुली करणाऱ्या एजंट्सनी दिलेल्या सततच्या त्रासामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Farmer Suicide : नांदेड जिल्ह्यात ५३ वर्षीय शेतकऱ्याने रेल्वे रुळावर आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. एका खासगी वित्त कंपनीच्या कर्ज वसुली करणाऱ्या एजंट्सनी दिलेल्या सततच्या त्रासामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
उमरी तालुक्यातील गणीपूर गावचे रहिवासी असलेले दत्ता मोहन उमटे हे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास रेल्वे रुळाजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना नांदेडमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र काही तासांनंतर त्यांचा मृत्यू (Farmer Suicide) झाला. शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, एका खासगी वित्त कंपनीचे एजंट कर्ज वसुलीसाठी त्यांच्यावर दबाव आणत होते, ज्यामुळे ते तणावाखाली होते.
सुमारे एक महिन्यापूर्वी हे एजंट गावात आले होते आणि त्यांनी उमटे यांना धमकावले होते. या प्रकारामुळे ते अत्यंत अस्वस्थ होते आणि त्यानंतर अनेकदा घराबाहेर राहू लागले होते. दरम्यान, याआधी झालेल्या एका वादामुळे वित्त कंपनीच्या प्रतिनिधींनी उमरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीच्या आधारे, उमटे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी दिली.
आता पोलिसांनी वित्त कंपनीच्या पाच एजंट्सविरुद्ध आत्महत्येस (Farmer Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी सांगितले. या घटनेमुळे खासगी वित्त कंपन्यांच्या कर्ज वसुली करणाऱ्या एजंट्सकडून होणाऱ्या कथित त्रासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






