Farmer Loan Waiver : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी (Farmer Loan Waiver) जून महिन्यात करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता कर्जमाफीची अंमलबजावणी नेमकी कधी होणार, याकडे शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने, हंगाम सुरू होण्यापूर्वी लवकरात लवकर कर्जमाफी अमलात आणण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि खरीप हंगामाच्या तयारीसंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना (Farmer Loan Waiver) दिले जाणारे क्रॉप लोन, कर्जमाफी, बियाणे-खते यांची उपलब्धता आणि यंदाच्या पावसाचा अंदाज या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. १. कर्जमाफीची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करणार फडणवीस म्हणाले, “आम्ही बँकांशी कर्जमाफीबाबत चर्चा केली आहे. कर्जमाफी (Farmer Loan Waiver) करायची आहे, याबाबत बँकांनी कोणत्या फॉरमॅटमध्ये माहिती द्यायची आणि कर्जमाफी कोणत्या पद्धतीने करायची, यावर सविस्तर चर्चा झाली. कर्जमाफीचा निर्णय वेळेत पूर्ण होण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे.” २. क्रॉप लोनसाठी सिबील (CIBIL) लागणार नाही शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी क्रॉप लोन सहज उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना अतिशय कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत की, शेतकऱ्यांकडून क्रॉप लोनसाठी सिबील स्कोअरची मागणी करू नये. बँकांच्या मुख्यालयाने सर्व शाखांना याबाबत स्पष्ट पत्र पाठवले पाहिजे. या पत्रात क्रॉप लोनसाठी सिबीलची अट नाही, हे नमूद असले पाहिजे.” Farmer Loan Waiver बैठकीला आरबीआयचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनीही याबाबत पुष्टी केली. “कुठल्याही शेतकऱ्याची क्रॉप लोनसाठी अडवणूक होणार नाही,” असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बँकांकडून क्रॉप लोन मिळणे लक्षणीयरीत्या सोपे होणार असल्याचे मानले जात आहे. विशेषत: ज्या शेतकऱ्यांचा सिबील स्कोअर कमी आहे, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने, बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या उपलब्धतेबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला. पावसाच्या अंदाजाबाबतही चर्चा झाली. शेतकरी संघटनांनी या निर्णयांचे (Farmer Loan Waiver) स्वागत केले असून, जून महिन्यात कर्जमाफीची अंमलबजावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे.