इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर जाहीर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pratap Sarnaik | महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने (एसटीए) ‘महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५’ अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले आहेत. दरम्यान, राज्यात भाडेदरामध्ये एकसूत्रता आणि समानता असण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक पार पडली होती.
या बैठकीत ‘महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५’ अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या विद्युत दुचाकी वाहनांचे भाडेदर प्रति किमी १०.२७ रुपयांप्रमाणे आकारणी करण्यास मान्यता दिली. अॅग्रीगेटर इ-बाइक टॅक्सीचा पहिला टप्पा १.५ किमी असेल. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे भाडे १५ रुपये असेल व त्यानंतर पुढील प्रत्येक किमी दराप्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे. Pratap Sarnaik |
राज्य परिवहन प्राधिकरणाने उबर इंडिया सिस्टीम प्रा.लि., रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि., अॅनी टेक्नोलॉजीस प्रा.लि. यांना ३० दिवसाकरीता ‘मुंबई महानगर क्षेत्राकरीता’ तात्पुरता परवाना देण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली. या परवान्याची मुदत ३० दिवसांची असून, त्यानंतर अंतिम लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल.
सर्व बाबींची अटींची पूर्तता झाल्यानंतर पक्का परवाना प्रदान करण्याच्या अंतिम मान्यतेसाठी राज्य परिहवन प्राधिकरणासमोर सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत. सध्या उबेर, रॅपिडो आणि अॅनी टेक्नॉलॉजीज या कंपन्यांना परवाना आहे. Pratap Sarnaik |
वाहतुकीवरील ताण कमी होऊन, प्रदूषणाला आळा बसणार
मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ७३ व ९६ नुसार शासनाला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर व पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी होऊन, प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा:





