Farah Khan And Baba Ramdev | बॉलिवूडची प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि चित्रपट निर्माती फराह खानने नुकतेच बाबा रामदेव यांच्या आश्रमाला भेट दिली. हरिद्वारमधील बाबा रामदेव यांच्या ‘आचार्यकुलम’ येथे फराह तिच्या लोकप्रिय कुकिंग व्लॉगसाठी पोहचली होती. जिथे तिने बाबा रामदेव यांच्यासोबत हलक्याफुलक्या खूप गप्पा मारल्या. यावेळी फराहने बाबा रामदेव यांची तुलना थेट सलमान खानसोबत केली. आश्रमाच्या दौऱ्यादरम्यान बाबा रामदेव यांनी फराह यांना मोठा परिसर दाखवला, ज्यामध्ये ध्यान केंद्र आणि शांततामय स्थळांचा समावेश होता. यावेळी बाबा रामदेव म्हणाले की, ‘आम्ही लोकांसाठी महाल बांधले आणि स्वतःसाठी झोपडी,’ तेव्हा फराह मजेदार अंदाजात उत्तर देत ‘मग तुम्ही आणि सलमान खान एकसारखेच आहात. तो पण 1 BHK मध्ये राहतो आणि इतरांसाठी त्याने महाल बांधले आहे,” असे म्हणते. तिचे हे बोलणं ऐकून बाबा रामदेव हसतात आणि हे अगदी बरोबर असल्याचे म्हणतात. या दोघांमधील ही मजेदार केमिस्ट्री सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. Farah Khan And Baba Ramdev | स्वयंपाकघर पाहून फराह झाली आश्चर्यचकित फराह खोलीत प्रवेश करताच तिथे ठेवलेले कमंडल पाहून आश्चर्यचकित होते आणि ते डिझायनरसारखे दिसत असल्याचे म्हणते. तेव्हा बाबा रामदेव तिला याची किंमत १ लाख रुपये असल्याचे सांगतात. तेव्हा ती स्तब्ध होते. यानंतर तिने आश्रमात असलेल्या गायी आणि वासरांना जेवण दिले. तिने मुले जिथे अभ्यास करतात ते ठिकाण पाहिले. जेव्हा तिने स्वयंपाकघर पाहिले तेव्हा ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की हे तिने पाहिलेले सर्वात मोठे स्वयंपाकघर आहे. बाबा रामदेव म्हणाले की अशा २०-२५ स्वयंपाकघरे आहेत जिथे ५० हजार लोकांसाठी जेवण बनवले जाते. यावेळी फराह खानसोबत तिचा स्वयंपाकी दिलीप होता. जो सध्या प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. Farah Khan And Baba Ramdev | दरम्यान, फराह खानने 2024 मध्ये त्यांच्या कुकिंग व्लॉगची सुरुवात केली, ज्यामध्ये ती तिचा वैयक्तिक शेफ दिलीप याच्यासोबत सेलिब्रिटींच्या घरी जाऊन स्वयंपाक करतात आणि हलक्याफुलक्या गप्पांसोबत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. त्यांच्या या व्लॉगची लोकप्रियता देखील सध्या प्रचंड वाढली आहे. Farah Khan And Baba Ramdev | हेही वाचा : Satara News : सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज गावाला मिळाली नवी ओळख; जागतिक पर्यटनाच्या नकाशावार झळकवणार कसं? वाचा…