Salman Khan : सलमान खानचा ‘तो’ व्हिडिओ पाहताच चाहते चिंतेत; स्वत: पोस्ट करत म्हणाला…
Salman Khan : सलमान खानने आतापर्यंत रुबाबदार आणि स्टायलिश शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. पण आता त्याचा असा लूक पाहून चाहत्यांना त्याच्या प्रकृती विषयी सतावत आहे.

Salman Khan : बॉलिवूडचा दंबग म्हणजेच सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला. ज्यात तो आजारी असल्यासारखे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताच, लोक त्याच्या तब्येतीबद्दल विचारपूस करू लागले. चाहत्यांनी त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली.
अलिकडेच सलमान खान क्रिम रंगाचा शर्ट आणि जीन्स घालून मुंबईतील स्लम रिहाबिलिटेशन अथॉरिटी (SRA) यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गेला होता. यावेळी भाईजानने अथॉरिटीचे नवे डेटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सपोर्ट सेंटरचे उद्घाटन केले होते. सलमान खानने आतापर्यंत रुबाबदार आणि स्टायलिश शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. पण आता त्याचा असा लूक पाहून चाहत्यांना त्याच्या प्रकृती विषयी सतावत आहे. (Salman Khan)
व्हायरल व्हिडीओनंतर सलमानने स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यात त्याने आपले काही फोटो शेअर केले आहेत आणि त्यात तब्येतीचाही उल्लेख केला आहे. सलमान खानने ब्लॅक अँड व्हाईट अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. तसेच या फोटोला हटके कॅप्शन दिलं आहे. ‘आप लोगों की तबीयत कैसी है?’ असा प्रश्न त्याने फॅन्सना विचारला. सलमानची ही पोस्ट त्याने सर्व काही ठीक आहे, असे सांगत उत्तर दिल्याचा अंदाज लावला जात आहे. (Salman Khan)
View this post on Instagram
सलमान खानने ब्लॅक अँड व्हाईट अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. यात त्याने वेगवेगळे हॅट्स घालून फोटो काढले तसेच शेअर केले आहेत. यात सलमान खान फिट आणि काही प्रमाणात बारीक झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. चेहऱ्यावर हलकी दाढी आणि सिरिअस लूक यात दिसत आहे. (Salman Khan)
View this post on Instagram
सलमान खानचा वर्कफ्रंट (Salman Khan)
सलमान खान सध्या ६० वर्षांचा असून गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून तो बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. सलमान खान शेवटचा ‘सिकंदर’ या चित्रपटात दिसला होता. आता त्याच्याकडे दोन नवे चित्रपट आहेत. सलमान लवकरच ‘मातृभूमी : मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचं पूर्वीचे नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ होतं.
तसेच तो दिग्दर्शक वामशी पैडीपल्ली यांच्या आगामी चित्रपटात नयनतारासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट 2027 च्या ईदला प्रदर्शित होण्याची शक्यता असून, सध्या त्याचं नाव ‘एसव्हीसी 63’ असे आहे.
हेही वाचा:
Sanjay Raut : “सरकार पोरांना घाबरलेय, ५६ इंच वाल्यांची हातभार…”; संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल





