अभिनेत्री नोरा फतेहीचा डान्स पाहून चाहते संतापले

अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच तिच्या अभिनयापेक्षा डान्समुळे चर्चेत असते. तिच्या डान्स मोव्हवर लाखो चाहते फिदा आहे. सोशलवर तिच्या डान्स स्टेप व्हिडिओ ट्रेडिंगवर असतात. अशात नोराचा पुन्हा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओ ‘डान्स प्लस प्रो’ या टीव्ही शोमधील आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्स संतापले आहे. सोशल मीडियावर युजर्स फॅमिली शोमध्ये हे सर्व काय चालले आहे? असा प्रश्न विचारत आहे.
हा व्हिडिओ डिस्ने प्लस हॉटस्टार आणि नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये नोरा स्टेजवर येताच ‘नाच मेरी रानी…’ वर नाचते आणि बाटलीतून पाणी स्वतःवर ओतते. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वच हैराण होतात.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नोराचे चाहतेही तिच्यावर नाराज झाले आहे. एकाने लिहिले, ‘माफ करा, पण माझा सर्व आदर गमावला. हा कसला घाणेरडा शो आहे? दुसऱ्या यूजरने याला ‘व्हल्गर’ म्हटले आहे. तर काहींनी ‘फॅमिलीसोबत बघताही येत नाही, आता हे सगळं अश्लीलता आहे’ अशी प्रतिक्रिया दिली. असं म्हणत सोशल मीडिया युजर्सने नोराच्या डान्सवर संताप व्यक्त केला आहे.





