Akshay Kumar : अक्षय कुमारची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची उसळली गर्दी; बॅरीकेड्सची तोडफोड, दिल्लीतील व्हिडिओ व्हायरल
Akshay Kumar : दिल्लीतील एका मॅालमध्ये अक्षय कुमाराला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आणि दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी भूत बंगला या सिनेमामुळे चर्चेत असून, सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तो दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा येथील गौर सिटी मॉलमध्ये पोहोचला असता, चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली. ज्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.
अक्षय मॉलमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच काही मिनिटांतच हजारोंच्या संख्येने लोक तिथे जमा झाले. सिनेमातील कलाकार वामिका गब्बी आणि राजपाल यादव हेही त्याच्यासोबत उपस्थित होते. मात्र, तिन्ही कलाकार एकत्र आल्याने गर्दीचा ताण अचानक वाढला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. याची सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
अक्षय कुमार आल्यानंतर चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी एस्केलेटरवर गर्दी केली. काहींनी उड्या मारत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्सही तोडण्यात आले. लोक एकमेकांना धक्काबुक्की करत पुढे सरकत होते.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये मॉलमधील परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे दिसून येते. यावरुन या गर्दीला नियंत्रित करण्यासाठीची सुरक्षा यंत्रणा अपुरी पडल्याचे स्पष्ट दिसते.
यानंतर अक्षय कुमारने शांतपणे परिस्थिती हाताळत चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तो मॉलच्या तळमजल्यावरून लोकांना संबोधित करत होता, पण चाहत्यांची झुंबड थांबत नव्हती.
View this post on Instagram
प्रमोशन संपल्यानंतर अक्षय मॉलमधून बाहेर पडत असताना परिस्थिती आणखी चिघळली. लोकांनी त्याच्याजवळ जाण्यासाठी धक्काबुक्की केली. थोडासा ताबा सुटला असता, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
भूत बंगला
येत्या 17 एप्रिलला अक्षय कुमार भूत बंगला सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अनेक वर्षांनंतर दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांची जोडी एकत्र आली आहे. सिनेमाच्या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.





