अमृता सुभाषच्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहते चिंतेत; फसवणूक झाल्याची रंगली चर्चा…

Amruta Subhash | अभिनेत्री अमृता सुभाष सध्या ‘जारण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. यात अमृतासोबत अभिनेत्री अनिता दाते मुख्य भूमिकेत झळकली आहे. यातील दोघींच्या अभिनयाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. यातच आता अभिनेत्री अमृता सुभाष एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने ‘CHEATED'(फसवणूक) असं ठळक अक्षरात लिहिलं आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “ह्याबद्दल बोलूच पण आत्ता पूर्ण लक्ष माझ्या दोन नाटकांवर…’असेन मी नसेन मी’ आणि’पुनश्च हनिमून'”. अमृताच्या या पोस्टने चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
अमृताला नक्की काय झालंय, की हा कोणता पब्लिसिटी स्टंट आहे या संभ्रमात चाहते पडले आहेत. ‘काय झालं अचानक’, ‘सगळं ठीक आहे ना?’, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. अमृताच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. Amruta Subhash |
अमृता सुभाषच्या जारण चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर, मराठीतील भय कथा लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले हृषीकेश गुप्ते यांनी जारणचे दिग्दर्शन केले आहे. जारण चित्रपटाने पहिल्या दिवशी १२ लाखांची कमाई केली होती. यानंतर चित्रपटाच्या कमाईत वाढ होत गेली. ‘जारण’मध्ये मानवी भावभावना, सामाजिक गुंतागुंत आणि संघर्षाचे वास्तव हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडले गेले आहे. चित्रपटातील कथा त्याची केलेली मांडणी, गाणी असे सगळचं गुंतवूण ठेवणारे आहे.
Amruta Subhash |
हेही वाचा:
Pune : शहरात किरकोळ वादातून दोन खून; आंबेगाव पठार आणि फुरसुंगीतील घटना





