‘जान्हवी कपूर’चा बोल्ड लूक पाहून चाहते हैराण; म्हणाले, “ही तर उर्फी जावेदच….’

मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘जान्हवी कपूर’ बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबतच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड इमेजसाठीही खूप चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ माजवत असते. जान्हवीचे चाहते तिच्या नवीन पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात.
अश्यातच अभिनेत्रीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यामध्ये जान्हवी खूपच मादक दिसत आहे. सध्या सगळीकडे अभिनेत्रीचे हे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. जान्हवी कपूर हिचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे.
या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर ही थाई हाई स्लिट बॅकलेस हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. जान्हवी कपूर हिचा हा ड्रेस पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. या ड्रेसमध्ये जान्हवी कपूर ही अत्यंत बोल्ड दिसत असून, फॅन्सला देखील तिचा हा मादक अंदाज आवडला आहे. मात्र, दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केल्याचं दिसून आलं आहे.
REEL – #TanviChemburkar’s latest reel ft. #JanhviKapoor💚
“Forever vibing on that perfect frequency 💥” pic.twitter.com/BoNFWnYz8W
— Janhvi Kapoor Universe (@JanhviKUniverse) April 27, 2023
या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, ‘ही तर उर्फी जावेदच आहे… तर दुसऱ्याने लिहिले की, ‘हिने खूप चांगल्या गोष्टी या उर्फी जावेद हिच्याकडून शिकल्या आहेत’. ‘सर्वांनाच उर्फी जावेद हिच्यासारखे बनायचे आहे’. अश्या अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत.
दरम्यान, अभिनेत्रीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास जान्हवी कपूर आता लवकरच साऊथ डेब्यू करणार आहे. विशेष म्हणजे थेट ज्यूनियर एनटीआर याच्यासोबत काम करण्याची संधी ही जान्हवी कपूर हिला मिळालीये. एनटीआर 30 चित्रपटात जान्हवी महत्वाच्या भूमिकेत आहे.





