Ankita Lokhande : गणपती बाप्पाच्या आरतीदरम्यान अंकिताच्या कृतीवर चाहते संतापले
Ankita Lokhande : अर्जुन बिजलानीच्या घरी बाप्पााच्या आरतीदरम्यान अंकिताची कृती पाहून चाहते भडकले

Ankita Lokhande : गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीच्या घरीदेखील दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पा विराजमान झाले आहेत. या आरतीला टेलिव्हिजन विश्वातील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील तिचा पती विकी जैनसोबत आरतीसाठी पोहचली होती. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अर्जुन बिजलानीच्या घरी बाप्पााच्या आरतीदरम्यान अंकिताची कृती पाहून चाहते संतापले आहेत. विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन या आरतीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आरती सुरू असताना अंकिता ‘मोरया’ बोलल्यानंतर हातांची अॅक्शन करून छोटं बाळ असल्याचं दाखवत आहे. त्यानंतर ती हसतानाही दिसत आहे. अंकिताचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram
अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. “अंकिता तुला काय झालं”, “ही दारू पिऊन आलीये का?”, “सस्ता नशा”, “हा क्लब नाही, जरा व्यवस्थित वाग”, “ही वेडी झालीये का”, अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी अंकिता बाप्पाकडे बाळाची इच्छा व्यक्त करत असल्याचंही म्हटले आहे. Ankita Lokhande
दरम्यान, अंकिता लोखंडे आणि विकी जैन लग्नानंतर ‘बिग बॉस १७’मध्येही झळकले होते. या शोमध्ये त्यांच्या नात्यातील गोडवा आणि मतभेद दोन्ही प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर अंकिता आणि विकी ‘लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाले होते. त्यांच्या धमाल केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. Ankita Lokhande
हेही वाचा:





