Adnan Sami : प्रसिद्ध गायक अदमान सामीने वजन कमी करण्याचं सांगितलं रहस्य ; म्हणाला माझ्याकडे 6 महिने शिल्लक….

बॅालीवूड इंटस्ट्रीमधील एक नावाजलेला गायक अदनान सामीने त्याच्या अल्बम आणि सिनेमातील गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्याची गाणी ही अत्यंत वेगळ्या धाटणीची राहिलेली आहेत. त्याच्या गाण्यांना लोकप्रियता मिळवून दिली ती तरुण चाहत्यांनी. आजही त्याची अनेक गाणी यूट्यूब आणि म्युझिक प्लॅटफॅार्मवर ऐकली जातात. मूळचा पाकिस्तानचा असलेला अदनान हा भारताचा नागरिक झाला आहे. अलीकडेच त्याने एका प्रसिद्ध वाहिन्याला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक मोठा खुलासा केला आहे. यामध्ये त्याने 230 किलो वाढलेलं वजन कसं कमी केलं याबद्दल सांगितलं आहे.
2006 मध्ये मला डॅाक्टरांनी सांगितलं होतं की, आता माझ्याकडे फक्त 6 महिने शिल्लक आहेत. त्याच कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन आहे. हे वजन त्याने न्यूट्रिशनिस्टच्या मदतीने वजन कमी केल्याचा खुलासा केला आहे. डॅाक्टरांनी मला सांगितलं होतं तू काही केल नाहीस तर वाचणार नाही. माझ्याकडे करो किंवा मरो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असल्याची आठवण त्याने या मुलाखतीमधून सांगितली. हिच माझ्या ट्रान्सफॉर्मेशन मागील खरी प्रेरणा होती, असा खुलासा त्याने केला आहे. याशिवाय दुसरं कोणतीही कारण यामागे नव्हतं, असे देखील त्याने या मुलाखतीमधून सांगितले.
वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना अदनान म्हणाला, वजन कमी करणं इतकं सोप नाही. जवळच्या लोकांनीही माझ्याकडून अपेक्षा सोडून दिल्या होत्या. वजन कमी करण्यासाठी मोठं आव्हान माझ्यासमोर होतं. मात्र, त्यावर मात करत मी वजन कमी केले असल्याचे त्याने सांगितले.





