VIDEO: कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारताच सुनिधी चौहानने दिले सडेतोड उत्तर

Sunidhi Chauhan Concert| गायिका सुनिधी चौहानच्या गाण्यांमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. तिचे भारतासह परदेशातही चाहता वर्ग आहे. अनेकदा तिचे विविध ठिकाणी कॉन्सर्टचे आयोजन करण्यात येते. नुकतेच डेहराडूनमधील कॉलेजमध्ये सुनिधीच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यावेळी सुनिधी गात असतानाच तिच्यावर बॉटल फेकून मारण्यात येते. सध्या तिच्या या शोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत दिसते की, सुनिधी ही स्टेजवर परफॉर्म करत आहे. यादरम्यान प्रेक्षकांमधील एक व्यक्ती सुनिधीला बॉटल फेकून मारतो. तरीही सुनिधी तिचं गाणं थांबवत नाही. ती गात राहते आणि गाण्याच्या काही ओळी गायल्यानंतर ती बॉटल फेकून मारणाऱ्याला सडेतोड उत्तर देते.
View this post on Instagram
यावेळी प्रेक्षकांना म्हणते की “काय होतंय? बाटल्या फेकल्या तर काय होईल? मला सांगा ना? असं केलं तर काय होईल? शो बंद होईल. तुम्हाला ते हवंय का?” तेव्हा सर्वजण एकत्र ‘नाही’ म्हणून ओरडतात. संपूर्ण क्लिपमध्ये सुनिधी शांत आणि हसताना दिसली. त्यानंतर सुनिधीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर कार्यक्रमाचे अनेक फोटो शेअर केले. या फोटोला सुनिधीनं कॅप्शन दिलं, “तुम्ही माझ्या पार्टीला आला आहात का??? माझी पार्टी अशी दिसते.”
दरम्यान, सुनिधीचा कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी सुनिधीचं कौतुक करण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने लिहिले की, “लोक खूप विचित्र आहेत. पण सुनिधीने यावर प्रतिक्रिया दिली नाही याचा त्यांना आनंद आहे.” ही घटना अगदी सहजपणे हाताळल्याने सुनिधीचं नेटकऱ्यांनी कौतुक केल आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी बॉटल फेकून मारणाऱ्या व्यक्तीवर संताप व्यक्त केला.





