Nagraj Manjule : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना न्यायालयाने बजावला समन्स; काय आहे नेमके प्रकरण?

मुंबई : मराठी आणि हिंदी दोन्हीही सिनेसृष्टीत प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. ते त्यांचा आगामी सिनेमा ‘खाशाबा’ यामुळे अडचणीत आले आहेत. हा वाद नेमका काय आहे याविषयी थोडक्यात जाणून घेऊया…
काय आहे नेमका वाद?
नागराज मंजुळे त्यांचा आगामी ‘खाशाबा’ घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र सिनेमा रिलीज आधीच ते वादात सापडले. या सिनेमाच्या कथेमुळे ते वादात सापडले आहेत. ‘खाशाबा’ सिनेमाची मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असल्याचे म्हंटले जातेय. त्यामुळे संजय दुधाणे यांनी संदर्भात कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी याप्रकरणी नागराज मंजुळेला कोर्टाद्वारे समन्सदेखील पाठवला आहे.
संजय दुधाणे यांनी नागराज मंजुळेवर आणि जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन आणि ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. नागराज मंजुळेचा आगामी ‘खाशाबा’ सिनेमा हा पैलवान खाशाबा जाधव यांचा बायोपिक आहे. मात्र या सिनेमाच्या कथेवरून ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.





