Vijay Khare Death : प्रसिद्ध खलनायक विजय खरे यांचे निधन
Updated On:

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध खलनायक विजय खरे यांचे निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूमुळे मराठी चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे.
काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. बंगळुरूमधील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
भोजपुरी मेगास्टार विजय खरे त्यांच्या विशेष खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जायचे. त्यांना बिहारचा गब्बर सिंग असंही म्हटलं जायचं. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. दरम्यान, विजय खरे यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या माघारी तीन मुले व पत्नी असा परिवार आहे.





