तब्बल 19 वर्षानंतर शाहरुखसोबत झळकणार सुप्रसिद्ध अभिनेत्री; ‘किंग’ चित्रपटात करणार कॅमिओ?

Rani Mukerji-Shah Rukh Khan Movies | अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुख लेक सुहाना खानसोबत दिसणार आहे. यातच आता या चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. यात अभिनेत्री राणी मुखर्जी देखील पाहायला मिळणार आहे. १९ वर्षानंतर राणी मुखर्जी आणि शाहरुख पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, राणी मुखर्जी शाहरुख खानच्या किंगमध्ये दिसणार आहे. राणी मुखर्जी चित्रपटात कॅमिओ करणार आहे. परंतु यात तिचीही भूमिका महत्वाची असणार आहे. यानंतर चाहत्यांची देखील उत्सुकता वाढली आहे. परंतु याबाबत चित्रपटाचे निर्माते किंवा कलाकरांनी देखील कोणताही अधिकृत माहिती दिलेली नाही. बहुचर्चित ‘किंग’ चित्रपटात शाहरुख खानसह सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, अभय वर्मा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्शद वारसी हे कलाकार सुद्धा पाहायला मिळणार आहेत. Rani Mukerji-Shah Rukh Khan Movies |
View this post on Instagram
राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांचे चित्रपट
राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांनी ‘कुछ कुछ होता है’, ‘चलते चलते’, ‘पहेली’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. राणीने ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘झिरो’मध्येही कॅमिओ केले होते. पण ‘कभी अलविदा ना कहना’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता, ज्यामध्ये ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकत्र दिसले होते. आता ते पुन्हा एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. Rani Mukerji-Shah Rukh Khan Movies |
राणी मुखर्जीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ‘किंग’ व्यतिरिक्त ‘मर्दानी 3’ मध्ये देखील ती दिसणार आहे.
हेही वाचा:





