Malaika Arora : बॅालिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी कोणत्या कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. नुकतेच तिने एक मुलाखत दिली असून, या मुलाखतीत अभिनेता अरबाज खानशी घटस्फोट घेतलेल्या निर्णयावर मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायका अरोरा आणि अरबाज खान हे दोघेही १९९८ मध्ये विवाहबंधनात अडकले. १८ वर्षांच्या सुखी संसारानंतर मलायकाने घटस्फोट घेण्याचा मोठा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाला त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी मोठा विरोध केला होता, असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. २०१७ मध्ये मलायका अरोराने तिचा पती अरबाज खानला घटस्फोट दिला. आता जवळजवळ आठ वर्षांनंतर मलायकाने त्यावेळी घेतलेल्या या निर्णयावर भाष्य केले आहे. तिने घेतलेल्या निर्णयाला तिच्या कुटुंबाने तीव्र विरोध केला होता. इंडिया टुडेला नुकतीच अभिनेत्रीने मुलाखत दिली. या मुलाखत तिने त्यावेळची आठवण सांगितली. “मला केवळ जनतेकडूनच नव्हे तर माझ्या मित्रांकडून आणि कुटुंबाकडूनही टोमणे आणि तीव्र विरोध सहन करावा लागला.” असा खुलासा मयालकाने केला. मात्र, टोकाचा विरोध होऊनही मलायका तिच्या निर्णयावर ठाम होती, असे देखील तिने सांगितले. मी माझ्या निर्णयांवर ठाम राहिले याचा मला आनंद आहे. मला कोणताही पश्चात्ताप नाही. मला माझे आयुष्य आवडते. मला प्रेम स्वीकारणे आणि वाटणे आवडते. मला अशा स्थितीत असणे आवडते जिथे मी एक सुंदर नातेसंबंध जोपासू शकते. पण त्याच वेळी मी ते शोधत नाही, असेही ती म्हणाली. याशिवाय यावेळी तिने तरुणांना कमी वयात लग्न न करण्याचा सल्ला देखील दिला. हेही वाचा : कट्टर राजकीय शत्रूच्या निधनाने शेख हसीना भावुक ; म्हणाल्या,”खालेदा झिया यांचे निधन…”