सोने-चांदीच्या किंमतीत घट; जाणून घ्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत

Gold – Silver Today| मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या सोने-चांदीच्या किंमतीने ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे. आज 22 एप्रिल 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत. स्वस्त झाल्यानंतर सोन्याचा भाव 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम पेक्षा अधिक आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव 81 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 73,161 रुपये आहे. शुद्ध चांदीची किंमत 81,939 रुपये इतकी आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, शुक्रवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 73,404 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 73,161 रुपयांवर आला आहे. त्यामुळे आज सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत. याशिवाय 18 कॅरेट सोन्याचा भाव 54871 रुपयांवर आला आहे. तर 14 कॅरेट सोने आज 42799 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
तुमच्या शहरातील सोन्याच्या किंमती जाणून घ्या…
मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,161 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 73,161 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 73,161 तर नाशिक 24 कॅरेट सोन्याचा दर 73,161 रुपये इतका आहे.
हेही वाचा:





