नववर्षाआधी पुण्यात मोठी कारवाई, सव्वा कोटी रुपयांची दारू जप्त; 9 जणांना अटक

Pune News: नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्काने पुण्यात 1 लाख 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची दारू जप्त केली आहे. या प्रकरणात 9 जणांना अटक करण्यात आली आहे. नववर्षाच्या निमित्ताने ठिकठिकाणी मद्यपार्टीचे आयोजन केले जाते. या निमित्ताने मद्यविक्रीतही वाढ झाली आहे. परंतु, दुसरीकडे बनावट दारूचाही पुरवठा केला जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून बनावट दारू घेऊन जाताना 9 जणांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीच्या 1668 बनावट दारूच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, काही वाहनांनाही जप्त केले आहे.
नववर्षाच्या निमित्ताने ठिकठिकाणी करण्यात आलेल्या नाकाबंदीच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी या कारवाईबाबत माहिती दिली.
ही बनावट दारू गोव्यातून पुणे, गुजरातला पाठवली जाणार होती. विटभट्टीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या पावडरच्या आडून आणि फ्रुट पल्पच्या पॅंकिंगच्या नावाखाली ही बनावट दारू राज्यात आणली जात होती.





