पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात दीड वर्षापूर्वी लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा शुक्रवारी केली. येत्या अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितलं आहे. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या. विरोधकांनी मोदींच पराभव म्हटलं. तर भाजपकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. यावर आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय घेतला होता. काही लोक त्याला सातत्याने विरोध करत राहिले. मोदींनी सांगितलंच की, आम्ही काही लोकांना पटवून देऊ शकलो नाही. त्यामुळे मी कायदे परत घेतोय. लोकशाहीमघ्ये अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात. मोदीजींनी ते करून दाखवल्याचं मोदींनी म्हटलं.
शेतकऱ्यांसाठी जे काही केलं ते मोदीजींनी केलं. किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत गेली आहे. युपीए सरकारच्या काळात कृषीचं बजेट 35 हजार कोटींचं होतं. ते आता एक लाख 35 कोटींचं झाल आहे. त्यामुळे टीकाकारांना जनताच उत्तर देईल, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटल की, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो. कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण असल्याचे





