फडणवीसांचाच रात्री शपथविधी; राजकीय आकलनाचे ‘नवनीत’
Updated On:

मुंबई – सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून वेगवान घडामोळी सुरु असून, मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ‘महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल, असा दावा केला’ आहे.
आज संध्याकाळपर्यंत सत्तास्थापनेचा तिढा सुटेल. सत्ता स्थापनेसाठी थोडा वेळ इकडे तिकडे होईल पण मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होतील. असं त्या म्हणाल्या आहेत.
विकासाच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. मात्र, शेवटी पोरं ही पोरचं असतात, असा टोला देखील नवनीत राणा यांनी यावेळी लगावला.





