मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात सद्या पेनड्राईव्ह, दाऊद गँग, आणि देवेंद्र फडणवीसांचे आरोप गाजत आहेत. फडणवीसांनी केलेल्या आरोपांना आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र फडणवीसांनी आज दिलेल्या पेनड्राईव्हमधील डेटा आणि केलेल्या दाव्यांवर अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या मुलीने प्रत्युत्तर दिलं आहे.
फडणवीसांनी सभागृहात दिलेल्या पेनड्राईव्हबाबत म्हटलं की, यात एक ऑडिओ क्लिप आहे. डॉ. मुद्दस्सिर लांबे यांचे संबंध दाऊदशी असून डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान यांच्यातील संभाषणाचा हा ऑडिओ असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ लांबे यांना राज्य सरकारने वक्फ बोर्डवर घेतलं आहे. मात्र एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे, असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी फडणवीसांच्या दाव्यांच खंडण केलं आहे. सना मलिक शेख यांनी डॉ. मुद्दस्सिर लांबे यांच्यासोबतचा फडणवीसांचा फोटो ट्वीट केला आहे. सोबतच म्हटलं आहे की, फडणवीसांनी सांगितलेलं अर्धसत्य हे पूर्ण खोटं आहे.
Half Truth is Full Lie!!
Dr. Lambe was appointed a Waqf Board member by Fadnavis/BJP govt on 13 Sept 2019.
MahavikasAghadi govt was established in November 2019. My father got Minority/Waqf Dept in the first week of Jan 2020.@Dev_Fadnavis with D-Gang Relative & a Rape Accused. pic.twitter.com/gMtApDZ5oc— Ar. Sana Malik-Shaikh (@sanamalikshaikh) March 14, 2022
डॉ. लांबे यांची 13 सप्टेंबर 2019 रोजी फडणवीस सरकारनेच वक्फ बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. महाविकास आघाडी सरकारची स्थापना नोव्हेंबर 2019 मध्ये झाली. माझ्या वडिलांना जानेवारी 2020च्या पहिल्या आठवड्यात अल्पसंख्याक/वक्फ विभाग मिळाल्याचं सना मलिक यांनी म्हटलं.