Face Shaving: आजकाल अनेक महिला चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी फेस शेविंगचा (Face Shaving ) पर्याय निवडत आहेत. हा उपाय सोपा, कमी खर्चिक आणि घरच्या घरी करता येणारा असल्यामुळे लोकप्रिय होत आहे. मात्र, योग्य पद्धतीने शेविंग न केल्यास त्वचेला इजा होऊ शकते. त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. Face Shaving महिलांच्या चेहऱ्यावर बारीक केस असणं हे सामान्य आहे. पण काही वेळा हे केस जास्त गडद आणि दाट होऊ लागतात. अशा वेळी ते हार्मोन्सच्या बदलांमुळे किंवा काही आरोग्य समस्यांमुळे होऊ शकतं. अशा परिस्थितीत फेस शेविंग हा एक सोपा उपाय मानला जातो. Face Shaving फेस शेविंगबद्दल अनेक गैरसमजही आहेत. काहींना वाटतं की शेविंग केल्याने केस जाड आणि जलद वाढतात. पण तज्ज्ञांच्या मते हे चुकीचं आहे. शेविंगमुळे केसांच्या वाढीवर कोणताही परिणाम होत नाही. उलट, हा केस काढण्याचा सुरक्षित आणि वेदनारहित मार्ग आहे. Face Shaving face shaving tips तथापि, शेविंग करताना काही चुका टाळणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली मोठी चूक म्हणजे कोरड्या त्वचेवर शेविंग करणे. ड्राय शेविंग केल्यास त्वचेवर कट, जळजळ आणि लालसरपणा येऊ शकतो. त्यामुळे शेविंग करण्यापूर्वी त्वचेवर मॉइश्चरायझर, जेल किंवा अॅलोवेरा जेल लावणं आवश्यक आहे. यामुळे ब्लेड त्वचेवर सहज सरकतं आणि त्वचा सुरक्षित राहते. Face Shaving दुसरी चूक म्हणजे केसांच्या उलट दिशेने शेविंग करणे. अनेकजण लवकर परिणाम मिळावा म्हणून ही चूक करतात. पण यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, नेहमी केस ज्या दिशेने वाढतात त्याच दिशेने शेविंग करावी. यामुळे कट्स, रेजर बर्न आणि इनग्रोन हेअरचा धोका कमी होतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेविंगनंतर त्वचेची योग्य काळजी घेणे. शेविंग केल्यानंतर त्वचा संवेदनशील होते आणि पोर्स उघडे राहतात. त्यामुळे त्या दिवशी रेटिनॉइड्स, एएचए किंवा बीएचए सारखे सक्रिय घटक असलेले प्रॉडक्ट्स वापरणं टाळावं. यामुळे त्वचेवर जळजळ आणि लालसरपणा वाढू शकतो. त्याऐवजी हलकं मॉइश्चरायझर लावणं अधिक फायदेशीर ठरतं. Face Shaving या साध्या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही घरच्या घरी सुरक्षितपणे फेस शेविंग करू शकता आणि त्वचा गुळगुळीत व स्वच्छ ठेवू शकता. योग्य पद्धतीने केलेली शेविंग त्वचेला कोणतीही हानी न पोहोचवता सुंदर लुक देते.