Skincare Tips: स्वच्छ, तेजस्वी आणि निरोगी त्वचा ही सगळ्यांचीच इच्छा असते. मात्र प्रदूषण, ताणतणाव आणि बदलती जीवनशैली यामुळे मुरुम, डाग-धब्बे आणि त्वचेचा निस्तेजपणा वाढतो. अशा वेळी आपण एक घरगुती, स्वस्त आणि सुरक्षित उपाय वापरू शकतो तो म्हणजे तुळस. भारतीय घराघरांत पूजेत असलेली तुळस ही केवळ पवित्र वनस्पती नसून औषधी गुणांचा खजिना आहे. राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेनुसार, तुळशीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुण रक्त शुद्ध करतात आणि त्वचेच्या समस्या मुळापासून कमी करण्यास मदत करतात. तुळस त्वचेसाठी कशी फायदेशीर ठरते? तुळशीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असल्यामुळे त्वचेवरील सूज, लालसरपणा आणि मुरुम कमी होतात. तुळशीचं नियमित सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि त्वचा आतून स्वच्छ होते. तज्ज्ञांच्या मते, तुळस ही महागड्या क्रीम्स आणि केमिकल ट्रीटमेंटपेक्षा जास्त सुरक्षित आणि परिणामकारक आहे. Tulsi benefits त्वचेसाठी तुळशीचे सोपे घरगुती उपाय तुळशीचा फेस पॅक मुरुम आणि हट्टी डागांसाठी ८–१० तुळशीची पानं बारीक वाटून त्यात मुलतानी माती किंवा मध मिसळा. हा लेप २० मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून २ वेळा वापरल्यास त्वचेत लक्षणीय सुधारणा दिसू शकते. तुळशीचं पाणी रात्री एका ग्लास पाण्यात ५–७ तुळशीची पानं भिजत ठेवा. सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्या. यामुळे शरीर आतून स्वच्छ होतं, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि नवीन मुरुम येणं कमी होतं. तुळशीचा चहा तणावामुळे होणाऱ्या मुरुमांसाठी तुळशीचा चहा फायदेशीर ठरतो. तुळशीची पानं पाण्यात उकळून त्यात थोडं मध किंवा लिंबू घालून प्या. हा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, ताण कमी करतो आणि त्वचेचा रंग सुधारतो. तज्ज्ञांचा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, तुळशीबरोबरच संतुलित आहार, भरपूर पाणी आणि नियमित झोप आवश्यक आहे. मुरुमांची समस्या खूप गंभीर असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.