Pune District | वाडा येथे आज नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर
Updated On:

राजगुरुनगर, – वाडा येथे बुधवारी, दि. २७ नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाळद येथील लोकनियुक्त सरपंच मनोहर पोखरकर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमानिमित्ताने वाडा येथील दत्त मंदिरात मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नेत्र तपासणी शिबिरात नामांकित डॉक्टर नेत्र तपासणी करणार आहेत. यासह मनोहर पोखरकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यानी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
नेत्र तपासणी शिबाराचा खेड आदिवासी भागातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अभिष्टचिंतन कार्यक्रमानिमित्ताने हभप समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होणार आहे.





