अग्निवीर प्रशिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

Agniveer Suicide: भारतीय नौदलासाठी अग्निवीर प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीने मुंबईत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी मंगळवारी या घटनेची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर्णा नायर असे मृत महिलेचे नाव आहे. अपर्णाच्या आत्महत्येची माहिती मिळताच नौदलाचे डॉक्टर घटनास्थळी पोहोचले, त्यांनी महिलेची तपासणी करून तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी मुंबईच्या मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अग्निवीरचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलेच्या आत्महत्येमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर अग्निवीर अमृतपाल याने गेल्याच महिन्यात केलेल्या आत्महत्येचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला. कारण, अमृतपाल यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवास सैन्य दलाकडून सन्मान न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता. यावरून राजकीय वर्तुळात एकच आरोप- प्रत्यारोप सुरू झाले होते.
Mumbai | A 20-year-old woman, who was under training in the Navy for Agniveer, allegedly died by suicide by hanging herself. As per an official, the woman was under training at INS Hamla at the time of the incident. Malvani Police registered an ADR and is carrying out further…
— ANI (@ANI) November 28, 2023
दरम्यान, सुरुवातीला अग्निवीर भरतीला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. अनेक ठिकाणी तरुणांनी या भरतीला विरोध करत आंदोलनेही केली होती. अग्निवीर भरतीप्रक्रियेतून सैन्य दलात भरती होणाऱ्यांना ४ वर्षे नोकरी देण्यात आली असून ४ वर्षानंतर त्यांना निवृत्ती देण्यात येत आहे. त्यामुळे या अग्निवीर भरतीला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर आता अग्निवीर प्रशिक्षण घेत असलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याप्रकरणी पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.





