विसर्जनासाठी खडकवासला मधून विसर्ग वाढविला
Updated On:

पुणे : शहरातील गणेश विसर्जनसाठी खडकवासला धरणातून सकाळी 11 पासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. रात्री 1700 क्यूसेक असलेला विसर्ग सकाळी 11 वाजता 3400 क्यूसेक करण्यात आला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने बुधवारी हा विसर्ग सुमारे 9 हजार क्यूसेक होता. गुरुवारी पहाटे तो पुन्हा 1700 क्यूसेक करण्यात आला होता. नंतर आज विसर्जनासाठी पुन्हा सकाळी 11 पासून तो 3400 क्यूसेक करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले





