परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताच्या कॅनडासोबतच्या वाढत्या तणावाबाबत भूमिका केली स्पष्ट; म्हणाले…

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताच्या कॅनडासोबतच्या वाढत्या तणावाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोमवारी नवी दिल्ली येथे आयोजित एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना परराष्ट्र मंत्री म्हणाले, भारत-कॅनडा तणाव हा एक सामान्य पाश्चात्य समस्या आणि कॅनडा-विशिष्ट समस्या आहे. यात दुहेरी प्रकार आहे. जागतिक समीकरणे बदलत आहेत. जगातील शक्ती संतुलन बदलत आहे, तथापि, सर्व पाश्चात्य देश एकसारखे नाहीत.
एस जयशंकर म्हणाले, जेव्हा मी अमेरिका किंवा युरोपमध्ये जातो तेव्हा तेथील देश म्हणतात की भारतासोबत काम करण्यात अर्थ आहे. पण कॅनडात या गोष्टी ऐकल्या जात नाहीत. १९४५ नंतर जागतिक व्यवस्था खूपच पाश्चात्य होती. १९९० नंतर ते खूप होते. मात्र गेल्या २० वर्षांत खूप बदल झाला आहे. जगात संतुलन बदलले आहे. अनेक गैर युरोपीयन देश खूप प्रभावशाली राहीली आहेत. त्यामुळे ते पचवणे आणि मान्य करणे काही पाश्चिमात्य देशांसाठी अवघड झाले आहे. कॅनडाची तीच समस्या आहे.
परराष्ट्र मंत्री म्हणाले, कॅनडाबाबतही एक इतिहास आहे. १९८० मध्ये कॅनडातून उड्डाण करणारे एअर इंडियाचे विमान पाडले गेले. यानंतर कूटनीती वेगळ्या दिशेने गेली. आता कॅनडाने आम्हाला आमचे उच्चायुक्त पोलीस तपासाच्या अधिन करण्यास म्हणजे तपासास सादर करण्यास सांगितले, मात्र आमच्या सरकारने त्यांचे म्हणणे फेटाळले. जयशंकर म्हणाले, कॅनडा स्वत: ला जो परवाना देते तो मुत्सद्दींवर लादलेल्या निर्बंधांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.





