परराष्ट्रमंत्री जयशंकर २४ डिसेंबरपासून अमेरिका दौऱ्यावर
Updated On:

नवी दिल्ली – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उद्या (दि. २४) पासून ६ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासून भारताचे उच्चपदस्थ नेते प्रथमच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
आपल्या दौऱ्यादरम्यान जयशंकर अमेरिकेतल्या वरिष्ठ पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. द्विपक्षीय पातळीवरील महत्वाच्या मुद्यांसह वेळी प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील मुद्यांवरही यावेळी चर्चा होणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
अमेरिकेतल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकांसह भारतीय वाणिज्य दूतांच्या परिषदेलाही जयशंकर संबोधित करणार आहेत, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.





