राज्य मुक्त विद्यालय मंडळ प्रवेशासाठी मुदतवाढ

पुणे – महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता ५ वी व ८ वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश अर्जासाठी १ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यासाठी १८ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता नावनोंदणी अर्ज ऑनलाइन स्वीकारण्यासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जाबर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करण्यासाठी २० जून ते ५ जुलै या कालावधीची मुदत देण्यात आलेली आहे. संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करण्यासाठी १२ जुलैची मुदत देण्यात आलेली आहे.
मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता ५वी व ८वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.





