पाकिस्तान पुन्हा एकदा हादरले; लाहोरमध्ये एकाच वेळी अनेक गॅस सिलिंडरचा स्फोट

Updated On:
पाकिस्तान पुन्हा एकदा हादरले; लाहोरमध्ये एकाच वेळी अनेक गॅस सिलिंडरचा स्फोट

लाहोर – दहशतवादी हाफीज सईदच्या घराजवळ स्फोट झाल्याची घटना ताजी असताना लाहोर शहर आज पुन्हा स्फोटाने हादरले आहे. लाहोरमधील बरकत या बाजारात एकाच वेळी अनेक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. स्फोटाच्या धक्क्याने परिसरात मोठ्या प्रमाणात हादरे बसले आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/1026471668095728

या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि इतर यंत्रणांनी धाव घेतली आहे. तसेच या यंत्रणांनी मदत व बचाव कार्यास सुरूवात केली आहे. या घटनेची व्हिडिओ देखील समोर आला आहे.

शहरात गॅस सिलिंडरचा सलगपणे स्फोट झाला आहे. यामध्ये जवळपास १० गॅस सिलिंडर फुटले असून एकाला गंभीर दुखापत झाली आहे. तर आजूबाजूच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिलिंडरचा सलगपणे स्फोट होत राहिल्यामुळे घटनास्थळी दाखल होण्यास बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागला.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बरकत बाजार आणि जवळचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे
शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Pakistan: पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठी दुर्घटना ; शाळेचे छत कोसळून २० मुलांचा मृत्यू

2026-10-15 13:29:46

Pakistan: पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठी दुर्घटना ; शाळेचे छत कोसळून २० मुलांचा मृत्यू

Pakistan News : पाकिस्तानने घेतली फतह - 2 क्षेपणास्त्राची चाचणी

2026-10-13 22:03:51

Pakistan News : पाकिस्तानने घेतली फतह - 2 क्षेपणास्त्राची चाचणी

Punjab News : पंजाबमध्ये मोठी कारवाई ! तरनतारन येथे दोन घुसखोर ठार

2026-10-02 16:03:29

Punjab News : पंजाबमध्ये मोठी कारवाई ! तरनतारन येथे दोन घुसखोर ठार

S. Jaishankar : सराईत दहशतवाद्यांचे युक्तिवाद टिकणार नाहीत; जयशंकर यांच्याकडून पाकिस्तानची पोलखोल

2026-09-27 19:48:44

S. Jaishankar : सराईत दहशतवाद्यांचे युक्तिवाद टिकणार नाहीत; जयशंकर यांच्याकडून पाकिस्तानची पोलखोल

Balochistan News : बलुचिस्तानमध्ये 73 दहशतवाद्यांचा खात्मा; पाकिस्तानी लष्कराचा मोठा दावा

2026-09-27 19:28:29

Balochistan News : बलुचिस्तानमध्ये 73 दहशतवाद्यांचा खात्मा; पाकिस्तानी लष्कराचा मोठा दावा