Indus Waters Agreement : सिंधू पाणी कराराबाबत भूमिकेत बदल नाही; परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण
सिंधू पाणी कराराबाबत (Indus Waters Agreement) भारताची भूमिका स्पष्ट असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, असे आज परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

Indus Waters Agreement : सिंधू पाणी कराराबाबत (Indus Waters Agreement) भारताची भूमिका स्पष्ट असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, असे आज परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. एससीओ नागरी संवाद मंचासाठी पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक भारत भेटीवर आले आहेत. त्यानंतर हे स्पष्टिकरण देण्यात आले.
पुराना किला येथे भारताच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या विचार मंचासाठी मलिक शुक्रवारी सकाळी भारतात आले आणि संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाच्या सत्रालाही ते उपस्थित राहिले होते. या परिषदेचे निमंत्रण पाकिस्तानसह शांघाय सहकार्य संघटनेच्या सर्व सदस्यांना देण्यात आल्याचे भारताने ऑक्टोबर महिन्यातच स्पष्ट केले होते.
गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर प्रथमच एखाद्या कार्यक्रमासाठी भारताकडून पाकिस्तानच्या मंत्र्यांना निमंत्रण दिले गेले आहे. मलिक यांच्याकडे सांस्कृतिक मंत्रालय नसले तरी पर्यावरण मंत्री मलिक हे या परिषदेला उपस्थित राहतील, असे पाकिस्तानने १४ नोव्हेंबरला स्पष्ट केले होते. मलिक यांनी पूर्वी सिंधू पाणी कराराबाबत भारतविरोधी वक्तव्य (Indus Waters Agreement) केले होते.
त्यामुळे भारताच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. द्विपक्षीय संबंध सुधारण्याची संधी म्हणून पाकच्या मंत्र्याच्या सहभागाकडे बघितले जाऊ लागले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधी उपाययोजनेचा म्हणून भारताने सिंधू पाणी करार (Indus Waters Agreement) स्थगित केला आहे.






