पुणे – ‘कातकरी’ मुलांच्या दिवाळी वस्तुंचे प्रदर्शन
Updated On:

पुणे – कातकरी समाजातील वंचित वर्गातील मुलांनी तयार केलेल्या पणत्या, आकाशकंदील आणि अन्य दिवाळी वस्तुंचे एक प्रदर्शन व विक्री केंद्र आकांक्षा प्रतिष्ठान आणि सुर्योदय फाऊंडेशनच्यावतीने भरवण्यात आले आहे.
घोरपडे पेठेत भरवण्यात आलेल्या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन स्थानिक नगरसेविका आरती कोंढरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर कमलताई व्यवहारे, सदानंद शेट्टी, महेश गायकवाड, रमेश कांबळे, कोमल पवार, रोहिणी दीक्षित, महेश सकट, विजय सोनावणे, राकेश काची इत्यादी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी कातकरी मुलांनी कौशल्याने तयार केलेल्या या वस्तुंचे कौतुक केले.
या वस्तुंच्या विक्रीला नागरीकांनाही चांगला प्रतिसाद देऊन त्यांच्या कलागुणांना दाद दिली.





