देवोलीना भट्टाचार्जीचे खास फोटोशूट; फ्लॉन्ट केला बेबी बंप

Devoleena Bhattacharjee Photoshoot | अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीला ‘गोपी बहू’ या नावाने मोठी ओळख मिळाली. लवकरच देवोलीना आई होणार आहे. त्यापूर्वी तिने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
देवोलीना भट्टाचार्जीने पती शाहनवाज याच्यासोबत हे फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये देवोलिना खूपच सुंदर दिसत आहे. सध्या देवोलीना भट्टाचार्जीचे फोटो व्हायरल होत असून चाहते यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. Devoleena Bhattacharjee Photoshoot |
View this post on Instagram
फोटो शेअर करताना देवोलीनाने लिहिले आहे की, ‘पालक म्हणून आमचा प्रवास लवकरच सुरू होणार आहे आणि त्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’ सध्या तिच्या या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. Devoleena Bhattacharjee Photoshoot |
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच देवोलीनाचा बेबी शॉवर सोहळा पार पडला, ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. देवोलीनाने 2022 मध्ये शाहनवाजसोबत लग्न केले, जो तिचा जिम ट्रेनर होता. अलीकडेच ती ‘छठी मैया’ या टीव्ही शोमध्ये दिसली होती, पण प्रेग्नेंसीमुळे तिला ही मालिका सोडावी लागली. Devoleena Bhattacharjee Photoshoot |
हेही वाचा:





