खळबळजनक ! नांदेडमध्ये अकराशे किलो गांजा जप्त
Updated On:

नांदेड – नांदेड शहरात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज एका ट्रक मधून आणण्यात आलेला अकराशे किलो गांजा जप्त केला आहे. आंध्रप्रदेशातून ट्रक मधून हा गांजा महाराष्ट्रात आणण्यात आला होता. त्याची किंमत 5 कोटी 63 लाख रूपये इतकी असून या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
एनसीबीचे प्रमुख अधिकारी समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की गुप्तचर सूत्रांकडून आम्हाला हा गांजा येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार अमोल मोरे व सुधाकर शिंदे या दोन अधिकाऱ्यांनी सापळा लाऊन हा ट्रक पकडला त्यात 1127 किलो गांजा सापडला. हा गांजा राज्याच्या अन्य भागात नेण्यात येणार होता. राज्यात एनसीबीचे सध्या धाडसत्र सुरू असून त्यात अनेक ड्रग पेडलर्सना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून या धंद्यातील बरीच माहिती सध्या मिळत आहे.





