पुणे जिल्ह्यातील साबळेवाडीत आढळला विवस्त्र मृतदेह
Updated On:

चिंबळी – साबळेवाडी (ता. खेड) येथे विहिरीतील पाण्यात एका 55 ते 60 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे; मात्र सबंधित व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून येथील पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 15) आकस्मित मृत्यू अशी नोंद केली. काळूराम शहाजी साबळे (वय 37, रा. साबळेवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.





