Pune Crime News : पुण्यात खळबळ…! चुलतीला आय लव्ह यू म्हणाला; पुतण्याला राग अनावर झाला अन्…

Pune Crime News : पुण्यातील चंदनगर भागातील आंबेडकर वसाहतीत आय लव्ह यू म्हणाल्याच्या रागातून एकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १२ अॅागस्ट मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चुलतीला आय लव्ह यू म्हणाल्याचा रागातून हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करत खून करण्यात आला. साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय 35) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय 21) आणि समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (वय 22) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मयत साईनाथ याला दारूचे व्यसन होते. अशी माहिती समोर आली आहे. तसेच पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्याला मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, चंदननगर परिसरात बेवारस मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
नेमंक काय घडलं?
मृत साईनाथ याने आरोपी सोन्या उर्फ आदित्य संतोष वालेकर याच्या चुलतीची छेड काढली होती आणि तिला आय लव्ह यू असं देखील म्हणाला होता. यामुळे राग अनावर झाल्याने आरोपींनी त्याला लाथा बुक्क्यांनी आणि हॅाकी स्टिकने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत साईनाथ गंभीर झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
आरोपींनीच फोन करून दिली खबर
पोलिस नियंत्रण कक्षाला एक व्यक्ती बेवारस पडल्याची माहिती आरोपी सोन्या उर्फ संतोष वाल्हेकर याने दिली. मात्र, पोलिसांच्या तपासा दरम्यान त्यानेच मित्राच्या मदतीने या व्यक्तीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा : “मी कधीही ‘छावा’, ‘द कश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट करणार नाही;” जॉन अब्राहम असं का म्हणाला?




