कोहिनूर ग्रुपचे सीएमडी कृष्णकुमार गोयल यांचा Excellence Award ने गौरव

मुंबई – कोहिनूर ग्रुपचे सीएमडी कृष्णकुमार गोयल यांना ‘एक्सलन्स अवॉर्ड 2023 ने सन्मानित करण्यात आले. गोयल यांनी केलेल्या सामाजिक कार्यातील उल्लखनीय योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान कार्नाय्त आला.
कृष्णकुमार गोयल हे शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांशी जोडले गेलेले आहेत. तसेच गोयल हे आपल्या कार्यातून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी देखील नेहमी मदत करतात. खडकी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन या नात्याने त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले ज्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण वाढीसाठी मदत केली.
महिला सक्षमीकरणावर गोयल यांचा विश्वास असून त्यांनी महिलांना उद्योजक बनण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.शैक्षणिक क्षेत्रासोबतच गोयल सांस्कृतिक क्षेत्रातही आपले योगदान देतात. या सर्व कार्याचा गुणगौरव म्हणून गोयल यांना ‘एक्सलन्स अवॉर्ड 2023’ने सन्मानित करण्यात आले.मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.





